Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या 'न्यू वुमेन्स'ने जपली हळदी कुंकू कार्यक्रमातून मकर संक्रांतीची परंपरा

पूर्ण स्वास्थ्य हेच सौंदर्य‌ : डॉ शक्ती पातकर




कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू वुमेन्स फार्मसीमध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधून संस्थेच्या विविध शाखेमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी हळदीकुंकूचे आयोजन केले होते. यावेळी परिसरात उभारलेला 'सेल्फी पॉइंट' आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.



कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादनाने करण्यात  आली. प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांनी प्रास्ताविकामध्ये आपली संस्कृती विद्याथ्यांमध्ये रुजावी, असे नमूद केले.




प्रमुख पाहुण्या डॉ. शक्ती पातकर यांनी विद्यार्थीनी व महिलांनी रोजच्या धावपळीच्या दैनंदिनीमध्ये सकस व संतुलित आहार घेतला पाहिजे. मानसिक, सामाजिक स्वास्थ्यबरोबर आरोग्यसंपन्न राहिले पाहिजे असा सल्ला दिला. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.स्वाती निगडे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालिका सौ. सविता पाटील यांनी विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केले.



यावेळी विद्यार्थिनींनी कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला महिला पालक, विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजाश्री पाटील यांनी केले. प्रा. दिव्या शिर्के यांनी आभार मानले.




कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील व व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.