Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी मराठी विद्या मंदिर शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुरेखा मगदूम यांचा सेवानिवृत्ती निमित निरोप समारंभ

नूतन सरपंच रमेश पुजेरी यांचाही करण्यात आला सत्कार 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): मराठी विद्यामंदिर तेरणी येथे प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुरेखा मगदुम यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ व तेरणी ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच रमेश पुजेरी यांचा सत्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



प्रारंभी सरस्वती प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्र. मुख्याध्यापक परशराम गायकवाड यांनी केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी सुमधूर स्वागत गीत सादर केले. यावेळी सेवानिवृत्ती निमित्त प्रभारी मुख्याध्यापिका  सौ. सुरेखा मगदूम यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.गीता फडके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नुतन सरपंच रमेश पुजेरी यांचा सत्कार श्री.गायकवाड यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन झाला.



यावेळी शिक्षक रमजान अंकली, श्रीकांत कल्लोळे, सुरेश कोटगी यांच्यासह कु.प्रतिक्षा कळविकट्टे, कु.राजनंदिनी सुतार, कु.मधुरा यादगुडी, कु.स्नेहा व्हनोळी, कु.खुशी चौगले व कु. शिवन्या आगसगी या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली.



यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुरेखा मगदूम यांनी शाळेसाठी डायस  भेटवस्तू सरपंच श्री.पुजारी यांचे हस्ते शाळेकडे सुपूर्द केले.



कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक बशीर करीमगोळ, विजय पाटील व शाळा व्यवस्थापन समिती यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक सखरू भोसले यांनी तर आभार शिक्षक के.एन.नाईक यांनी मानले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन  समिती सदस्य, मगदूम परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.