Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुगळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकांत माने यांची निवड



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी चंद्रकांत माने यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसरपंच बसवराज दराडे यांची मुदत संपल्यामुळे ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच मलिकार्जुन आरबोळे होते.




स्वागत ग्रामसेविका साधना गवळी यांनी केले. नूतन उपसरपंच यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन रमेश आरबोळे व तमाणा माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मलिकार्जुन आरबोळे, माजी उपसरपंच बसवराज धनवडे, संतोष भोसले, संपदा पाटील, वर्षा घोटणे  यांच्यासह मुगळी ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.