Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वि.स.खांडेकर यांनी समाजशिक्षकाचा वसा समाजाला दिला !

गडहिंग्लज येथे ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन 


शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  व्याख्यानमाला 



                                                छायाचित्र  : मज्जिद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): वि.स.खांडेकर हे समाज शिक्षक होते. तत्कालीन पिढीला जगण्याचा मार्ग दाखविला आहे. वि.स.खांडेकर यांनी समाजाला समाजशिक्षकाचा वसा दिला आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाला वैचारिक बैठक दिलेली आहे. वि.स.खांडेकर यांचे साहित्य वाचले तर आम्हाला आदर्श व्हावे असे वाटणारे लेखन होते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले.




गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कै.भाऊसाहेब खांडेकर तथा वि.स.खांडेकर’ व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. यावेळी व्याख्यानामध्ये बोलताना ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ‘’वि.स.खांडेकर जीवन व साहित्य’ या विषयावर बोलताना ते म्हणाले,  वि.स.खांडेकर यांनी मराठी साहित्याला लघुकथा आणि लघुनिबंध या दोन साहित्य प्रकारांनी समृद्ध केले आहे. ते मराठीतील पहिले व शेवटचे लेखक आहेत.स्वातंत्र्यानंतरच्या आमच्या पिढीला पूर्वसंचित म्हणून आम्हाला अशी माणसं भेटली आम्ही खऱ्याअर्थी घडलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.आमचा काळ हा आदर्शांचा काळ  होता. त्याकाळी संपूर्ण काळ कळायला वाचनाशिवाय पर्याय नव्हता. आज तुम्ही जग खिशात घेऊन फिरत आहात. तरी देखील आजच्या परिस्थिती चांगले घडणे महत्वाचे आहे. आज काळ बदलला, कूस बदलली आणि नव्या आदर्शांचा शोध सुरु होत आहे. म्हणूनच नव्या पिढीला वि.स.खांडेकर जीवन आणि साहित्य समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली असल्याचे डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी सांगितले. खरेतर वाचल्याशिवाय लेखक होता येत नाही. वि.स.खांडेकर यांनी आपल्या आयुष्याची मिळकत वाचनासाठी घालविली असे ध्येयवादी शिक्षक म्हणून त्यांनी शिरोडामध्ये शाळा सुरु केली. वि.स.खांडेकर यांच्या रूपाने समाजाला एक ध्येयवादी शिक्षक आणि समाजाला द्रष्टा लेखक मिळाला असे सांगितले.



या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून प्रा.किसनराव कुराडे यांनी वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर हे कोण होते हे आजच्या पिढीला कळले पाहिजे. त्यांनी ध्येयवादी शिक्षक म्हणून समाजाला काय योगदान दिलेले आहे. त्यांच्या साहित्यातून आपण सर्वांनी बोध घेणे गरजेचे असल्याचे सांगून आजच्या विद्यार्थ्यांनी वि.स.खांडेकर यांचे साहित्य आवर्जून वाचले पाहिजे असे प्रा. कुराडे यांनी सांगितले. संस्थेचे सदस्य डॉ. बाळासाहेब इंगळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास श्री जे.बी.बारदेस्कर,  शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, सदस्य डॉ. बाळासाहेब इंगळे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी रेखा पोतदार, बाबा नदाफ, साताप्पा कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.




या कार्यक्रमात प्रारंभी मराठी विभाग प्रमुख डॉ. मनमोहन राजे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.श्रद्धा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.अशोक मोरमारे सूत्रसंचालन यांनी केले तर डॉ.लोहिता माने यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.