गडहिंग्लज येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सहकार्य
गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक कै. अर्जुन चिलमी यांच्या स्मरणार्थ गडहिंग्लज येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आणि शिक्षक समिती आणि शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व उच्च प्राथमिक पाचवी शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक दोन विद्या मंदिर बसर्गे येथील केंद्रावर उत्साही वातावरणात सुरुवात झाली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, केंद्रप्रमुख सुरेश हुली, पतसंस्थेचे चेअरमन भरत पाटील, संचालक परशराम गायकवाड, सुनिल सुरंगे, भास्कर पाटील, सुहास टकेकर, मार्गदर्शक रामचंद्र सिताप, अनिल कुराडे, रमेश पाटील, मारुती कोलूनकर, शिवाजी पाटील, दादासाहेब पाटील, श्री. बारामती, मुख्याध्यापक भीमराव तराळ उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी श्री. हालबागोळ यांनी परीक्षा घेतले बद्दल पतसंस्था व शिक्षक समितीचे आभार मानून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्री सिताप यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दादासाहेब पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.


