विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा, यशाचा घेण्यात आला आढावा
गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा करण्यात आला सन्मान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील विद्या मंदिर नौकुड शाळेत बालसभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सरपंच शुक्राचार्य चोथे होते.
प्रारंभी सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
तसेच शाळेच्या माध्यमातून विविध स्पर्धा, परीक्षा, सांसकृतिक कार्यक्रम यामध्ये विद्या मंदिर नौकुड शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. यामध्ये प्रतीक्षा मांगले या विद्यार्थिनीने कथाकथन स्पर्धेत केंद्रस्तरीय प्रथम, तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ७वीचे विद्यार्थी समर्थ चोथे व हर्षवर्धन गोसावी यांनी सर्पदंशापासून शेतकऱ्याचे संरक्षण करणारे तयार केलेले बूट, तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेश कुंभार यांचा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनमध्ये तृतीय क्रमांक, शृतलेखनमध्ये प्रांजळ कदम व संचीता कोरे यांचे यश, इंग्रजी शब्दलेखनमध्ये प्रतीक्षा मांगले , संजीवनी गोईलकर, केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेतील धावणे स्पर्धेत अंकुश चव्हाणचे तिहेरी यश, उंच उडीत व गोळा फेकमध्ये प्रथम क्रमांक, सार्थक सुर्वे ४००मी धावणेमध्ये व्दितीय, प्रतीक्षा लोहार गोळा फेकमध्ये प्रथम, कबड्डी व खो खो स्पर्धेत शाळेचे खेळाडूंनी मिळवलेले यश आदी बाबींचा समावेश होता. त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव यांनी केले. सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी आपल्या मनोगतात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. यापुढे देखील शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शिक्षिका पाथरवट यांनी शाळेविषयी माहिती दिली. शिक्षक श्री. पापळ यांनी आभार मानले.
यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव, उपसरपंच सौ. रेखा सरदेसाई, ग्रामपंचायत सदस्या सौ. हिराबाई चौगुले, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुवर्णा गोसावी, श्रीमती सुरेखा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी, विद्यार्थी शिक्षक, पालक उपस्थित होते.










