गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील पीएम श्री केंद्र शाळा मतदान केंद्र क्रमांक 74 ते 80 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थी व शिक्षक , शिक्षिका, भडगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक, मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.
1 जानेवारी 2025 रोजी वय वर्ष 18 पूर्ण होणाऱ्या युवक युवतींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत आवाहन करण्यात आले. यावेळी केंद्र शाळा भडगाव येथील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


