शिवराज विद्या संकुलाचे सहकार्य; जपली सामाजिक बांधिलकी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्य परिवहन महामंडळाच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात सहभाग घेऊन शिवराज विद्या संकुलाने गडहिंग्लज आगार परिसरात केलेल्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन एसटी महामंडळाचे कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज बयाजीराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किसनराव कुराडे होते. तर माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वातीताई कोरी, संस्थेचे उपाध्यक्ष के.जी. पाटील, जे.वाय. बारदेस्कर, आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे उपस्थित होते.
प्रारंभी पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव म्हणाले, आम्ही एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या प्रयत्नाला शिवराज विद्या संकुलासारख्या शिक्षण संस्थेने आमच्या बसस्थानक स्वच्छता सुशोभीकरणासाठी सहकार्य केले आहे. ते खरोखरच स्वच्छ सुंदर अभियानात आमचे एस.टी. आगार यापूर्वी मिळवलेल्या स्वच्छ व सुंदर बसस्थानक पुरस्कारापेक्षा या पुढील पुरस्काराचा नक्कीच मानकरी ठरेल. अशी अशा व्यक्त करून आगारासाठी अनेकांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी एस.टी. महामंडळाने प्रवासांच्या सेवेत अग्रस्थान निर्माण केले आहे. आजही एसटी महामंडळाने मोलाचे स्थान टिकवले आहे. एस.टी. महामंडळाने आजही प्रवासी वाहतूक सेवेत मोलाचा वाटा आहे. हे सर्वांनी जाणलेले आहे. शिवराज विद्या संकुल आपल्या परीने समाजासाठी केलेले हे कार्य समाजाचे ऋण मानून ऋणानुबंध जपणारे आहे असे हे सुशोभीकरण जिल्ह्यात मॉडेल ठरणार आहे प्रतिपादन त्यांनी केले.
माजी नगराध्यक्षा प्रा. स्वातीताई कोरी यांनी शिवराज विद्या संकुलाने बसस्थानक परिसरात सुशोभीकरण करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले आहे. एक खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी शिवराज विद्या संकुलाची भूमिका स्पष्ट करताना आगाराने आम्हाला बसस्थानक परिसरात सुशोभीकरणासाठी संधी दिली. या संधीतून सुशोभीकरण करून शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून समाज ऋण जपल्याचे स्पष्ट केले. यावेळी एस.टी. आगाराच्या वतीने संस्थेचे सचिव अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आर्किटेक्चर अमोल सुतार, आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे बसवराज आजरी, राजेंद्र मांडेकर, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, नागेश चौगुले, आण्णाप्पा शेंडे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव प्रा. विश्वजीत कुराडे यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, एस. टी. चालक - वाहक व कर्मचारी, शिवराज विद्या संकुलाचे सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी, प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी आभार मानले.


.jpg)


