Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगेच्या दीप इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी



गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : दुंडगे येथील  दीप इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे प्रशासक  महादेव तुरंबेकर  यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.




शिक्षिका एस. आर. फुटाणे यांनी  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले या  पहिल्या महिला शिक्षिका होत्या. मुलीना शिकवण्यासाठी  जाताना त्यांना अनेक मानहानी प्रकारांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी न डगमगता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. आज मुली शिकून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन मुलींनी शिक्षणात प्रगती करून मोठे झाले पाहिजे, असे सांगितले. मुख्याध्यापिका विद्या कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देत मुली, महिला शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात  कार्यरत आहेत. मुलींनी चांगले शिक्षण घेऊन  उच्च पदावर काम केले पाहिजे असे सांगितले. 




सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले ठामपणे  उभे राहिल्यामुळे मुलींना शिक्षण देणे सोपे झाले असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी  संस्थापिका अध्यक्षा प्रा. अनिता पाटील यांची प्रेरणा, तर मुख्याध्यापक लक्ष्मण दावणे यांचे मार्गदर्शन  लाभले. यावेळी  सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.