गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील महागाव येथील नदी काठावरील विद्युत मोटरीच्या केबल व पाईपची चोरी झाली आहे. याबाबतची माहिती ग्रामपंचायतीने ३ जानेवारीला गडहिंग्लज पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे कळविले आहे. दरम्यान, याबाबत काल पोलीस घटनास्थळी दाखल झाले होत माहिती घेऊन तपास सुरू केला आहे.
महागांव येथील नदी काठावर बऱ्याच शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत. दरम्यान, येथील १२ शेतकऱ्यांचे विद्युत पंप केबल व पाईप काही अज्ञात व्यक्तीनी चोरून नेली आहेत. अदाजे ५ ते ६ लाख रुपयांचा हा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे झालेले आहे. याबाबत गडहिंग्लज पोलीस ठाण्याला ग्रामपंचायतीने कळविले असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.


