गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावच्या सरपंचपदी रमेश गुरुसिद्धया पुजेरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंडल अधिकारी व्ही. ए. कामत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली.
![]() |
| तेरणी : नूतन सरपंच रमेश पुजेरी यांचा सत्कार करताना मंडल अधिकारी विजय कामत. यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके. |
तेरणी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षात रोटेशन पद्धतीने सदस्यांना संधी देण्याचे ठरले होते. या पार्श्वभूमीवर मावळते सरपंच करवीर उथळे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सदस्य रमेश पुजेरी यांना सरपंच पदी संधी देण्यात आली. सरपंच पदासाठी श्री. पुजेरी यांचे नाव सदस्य मोसिम मुल्ला यांनी सुचविले. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सरपंच पदी रमेश पुजेरी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नूतन सरपंच रमेश पुजेरी यांचा सत्कार मंडल अधिकारी श्री. कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मावळते सरपंच करवीर उथळे यांनी नूतन सरपंच रमेश पुजेरी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नूतन सरपंच श्री. पुजेरी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बस स्टँड चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
![]() |
| तेरणी : मावळते सरपंच करवीर उथळे यांचा सत्कार करताना ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके. यावेळी शेजारी नूतन सरपंच रमेश पुजेरी. |
या निवडी प्रसंगी उपसरपंच सोनव्वा कतीगार, सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
कमी कार्यकाळात गावात उत्तम विकासात्मक काम करू : नूतन सरपंच रमेश पुजेरी
निवडीनंतर नूतन सरपंच रमेश पुजेरी म्हणाले, सरपंच पदाचा आपल्याला कमी कार्यकाळ मिळाला असला तरी या संधीचे गावात उत्तम विकासात्मक कामे करून सोने करण्यासाठी प्रयत्न करू. ग्रामस्थांच्या विविध समस्या व प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.




