गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीच्या भोसले दांपत्याचा उपक्रम
मुलांना शालेय वस्तूंचे केले वाटप

गडहिंग्लज : येथील हलकर्णीच्या भोसले दांपत्याने आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मूकबधिर शाळेत साजरा केला. यावेळी मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मित्र मंडळी.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ना भला मोठा केक, ना गार्डन,कोणती खर्चिक सजावट या सगळ्या गोष्टींना फाटा देत हलकर्णीच्या भोसले दांपत्याने आपला मुलगा श्रितेजचा वाढदिवस शाळेत साजरा केला.
सुरज व सौ कोमल हे हलकर्णी गावातील खासगी संस्थेत लिपिक म्हणून काम करतात. त्यांनी आपला मुलगा श्रीतेज याचा पहिला वाढदिवस मूकबधिर शाळेत साजरा करण्याचा ठरवला. यासंबंधी प्रशालेच्या मेघा मोकाशी व गिता कलकुटगी यांच्याशी संपर्क साधून शाळेची माहिती घेतली. त्यानुसार रविवारी शाळेतील शिक्षक व 40 मुलांसाठी गोड जेवण, वह्या,पेन्सिल्स इत्यादी शैक्षणिक वस्तू घेत भोसले दांपत्य मित्रमंडळीसह गडहिंग्लजच्या मूकबधिर शाळेत पोहोचले. येथे सर्व मुलासमवेत मुलाचा वाढदिवस साजरा केला. शाळेतील मुलांंना वह्या, पेन, पेन्सिलचे वाटप करण्यात आले. मुलींसाठी शाळेत आरसा नसल्याचे सांगण्यात आल्याने. त्वरित शाळेसाठी दोन मोठे आरसे आणून दिले. भोसलेे दांपत्याच्या या विधायक उपक्रमा बद्दल मुख्याध्यापिका मेघा मोकाशी यांनी ऋण व्यक्त केले.
यावेळी विजय लोखंडे,अश्विनी लोखंडे,करवीर तेगनाळे,सुमित पाटील, सुदर्शन हुकिरे, परमेश्वर गायकवाड,विनायक भोसले, रुपेश भोसले, आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज : येथील हलकर्णीच्या भोसले दांपत्याने आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मूकबधिर शाळेत साजरा केला. यावेळी मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मित्र मंडळी.


