मुंबई : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेचा १५०० रुपयांचा निधी पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारने खुशखबर दिली आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडके बहीण योजनेचे पैसे 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच दिली होती. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येत आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देखील देण्यात आली होती. आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाले आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे.

