जयंतीनिमित्त २७ जानेवारीपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज येथे श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर २२ जानेवारीपासून सुरू झाले असून दिनांक २७ जानेवारी पर्यंत चालणार आहे.
येथील दसरा चौकात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुकाप्रमुख दिलीपराव माने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख प्रकाश रावळ, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, सागर हेब्बाळे, वसंत नाईक, सुधाकर जगताप, मनीष हावळ, श्रीशैल साखरे, संदीप चव्हाण, अनिल खणाई, गजराज सासणे, काशिनाथ हालसोडे, विलास यमाटे, दिगंबर पाटील, संकेत रावण, संभाजी येडूरकर, तेजस घेवडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

