गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील शिवसेना शाखेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य सौ. रोहिणी चौगुले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाजार समिती संचालक रवींद्र शेंडूरे, काँग्रेसचे अजित बंदी, पोलीस पाटील उदय पुजारी, रविशंकर बंदी, सचिन विभुते, महादेव भकरी, विठ्ठल पुजारी, अमित राजमाने, कलाप्पा जंगली, करवीर स्वामी, बाळासाहेब कडोळी, शेवंता नाईक, केतन कोरी यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. शिवसेना उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.


