Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी



गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : येथील साधना प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य आय.पी. कुटिन्हो यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.



सहाय्यक शिक्षिका सौ. कविता कोळेकर यांनी मनोगतातून सावित्रीबाईंच्या कार्याचे वर्णन केले. तसेच समाजसेवक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान केली म्हणून संपूर्ण देशात ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा सोहळा साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.



कार्यक्रमाचे नियोजन शीतल हरळीकर, अफसाना यळकुद्रे, शितल भवारी, सौ. एस. एस. नाईक,  निलोफर शेख, अनुसया कोकाटे, सौ. सारिका देसाई, सौ. मनीषा पाटोळे, बर्था फर्नांडिस यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक  ए. जे. बारदेस्कर, ज्येष्ठ शिक्षक आर. सी. हिरेमठ, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.