Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुदृढ, निरोगी भारतासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करा !

वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्ना चौगुले  यांचे विद्यार्थ्यांना आवाहन 


महागावात महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये क्षयरोग, कुष्ठरोग व एड्स आजाराविषयी मार्गदर्शन





गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थी हे भविष्यातील उज्ज्वल भारताचे नागरिक आहेत. त्यामुळे  त्यांनी क्षयरोग, कुष्ठरोग, एड्स या आजाराविषयी समाजामध्ये जागृती करावी. सदृढ व निरोगी भारत निर्माण करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुरू केलेल्या या लोकचळवळीत सहभागी व्हावे व आपल्या कुटुंबातील, परिसरातील नागरिकांना या आजाराविषयी माहिती देऊन आरोग्य केंद्राला सहकार्य करावे असे आवाहन महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्ना चौगुले (शिखरी) यांनी केले.




येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित क्षयरोग, कुष्ठरोग व एड्स या आजाराविषयी मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय.एस. पाटील होते. तर डॉ. श्वेता इंजल, एम. बी. मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.



वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगुले पुढे म्हणाले, क्षयरोग,कुष्ठरोग व एड्स हे आजार संसर्गजन्य आजार आहे. याचे वेळीच निधान करून योग्य सल्ला व औषध उपचार घेतल्यास आजार बरा होऊ शकतो. यासाठी या आजारांचे समाजात जागृती होणे गरजेचे आहे असे सांगून या रोगाची लक्षणे व उपाय याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.




स्वागत व प्रास्ताविक संदेश कोकितकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश चौगुले व आभार किरण पाटील यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.