Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दियाराणी कोरवी व आर्यन गोणी प्रथम

गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या हस्ते गौरव 


तालुक्यातील दहा केंद्रातून विद्यार्थ्यांचा सहभाग





गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, गडहिंग्लज पंचायत समिती शिक्षण विभाग व भावेश्वरी चारिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने येथील गडहिंग्लज पंचायत समितीच्या बीआरसी विभागात पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मुलींमध्ये दियाराणी कोरवी व मुलांमध्ये आर्यन गोणी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या दोघांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी तालुक्यातील दहा केंद्रातील १५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या स्पर्धकांना गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.



प्रास्ताविक व स्पर्धेविषयी माहिती प्रा. व्ही. डी. काळे यांनी दिली. या स्पर्धेत मुलीमध्ये पुनम बिर्जे व दर्शना बामणे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक तर मुलांमध्ये श्रेयस कांबळे व  आकाश नाईक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.



परीक्षक म्हणून प्रा.एस. व्ही. चव्हाण, प्रा. व्ही. डी. काळे, प्रकाश चौगुले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन दयानंद कोरवी यांनी तर आभार विषय तज्ज्ञ इकबाल जमादार यांनी मानले. यावेळी केंद्रप्रमुख सुरेश डुली, वरिष्ठ लेखा लिपिक सलीम मुल्लाणी यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.