कै. नारायण बामणे यांच्या स्मरणार्थ कु. आदित्य व सौ.अलका अनिल बामणे यांचा उपक्रम
शाळेमार्फत बामणे कुटुंबीय व इतर देणगीदारांचा सत्कार
आजरा : पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा व केंद्र शाळा उत्तुर मुख्याध्यापक अनिल नारायण बामणे यांच्यामार्फत आज कै. नारायण बाबू बामणे यांच्या स्मरणार्थ इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका कु. आदित्य सौ.अलका अनिल बामणे व बामणे परिवाराकडून प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तूरचे सरपंच किरण आमणगी तर केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन उत्तूरकर, उपाध्यक्ष डॉ. सचिन पोवार, कन्या विद्यामंदिरच्या उपाध्यक्षा पूजा उत्तूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत कन्या विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संतोष गुरव यांनी तर प्रास्ताविक संतोष शिवणे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रश्नपत्रिकांसाठी देणगी देणारे केंद्रशाळा उत्तूरचे मुख्याध्यापक अनिल बामणे व सौ.अलका बामणे यांचा पंचायत समिती मार्फत व दोन्ही शाळेमार्फत सत्कार करण्यात आला. त्यानंतर केंद्रशाळेसाठी ढोल व ड्रम देणारे विष्णू मोरे व प्रिंटरचे देणगीदार अमित कांबळे, अर्चना रेडेकर, प्रियंका पाटील तसेच शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका तयार करणारे तानाजी पावले, संतोष शिवणे, संतोष गुरव यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर अनिल बामणे यांनी दोन्ही शाळेच्या कार्याचा आढावा, सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल तसेच शैक्षणिक प्रगतीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी गडहिंग्लज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. के. देसाई, उत्तुरचे केंद्रप्रमुख संतोष बिल्ले, माजी केंद्रप्रमुख व शिक्षक नेते मधुकर येसणे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये किरण आमणगी यांनी केंद्रशाळा व कन्या शाळेच्या शैक्षणिक विकासाबद्दल गौरव उद्गार काढले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिवाजी कुदळे, दिलीप राजदीप, दीपक कांबळे, प्रशांत पाटील व सोनाली पाटील यांनी परिश्रम घेतले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते मधुकर येसणे, शिक्षक नेते व केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई, शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष निकम, विघ्नहर्ता समूहाचे अध्यक्ष धनाजी रावण, गडहिंग्लज संघाचे तालुकाध्यक्ष अनिल बागडी, शिक्षणमंचचे माजी अध्यक्ष बाळासो वालीकर, शिक्षक समिती आजऱ्याचे तालुकाध्यक्ष एकनाथ आजगेकर, गडहिंग्लज शिक्षक समितीचे सरचिटणीस नामदेव पाटील, आजरा शिक्षक समितीचे सहसरचिटणीस लक्ष्मण सुतार, गडहिंग्लज बीआरसी प्रमुख चंद्रकांत जोशी, शामराव माळकरी,आजरा शिक्षक संघाचे सरचिटणीस रवींद्र दोरुगडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मधुकर जरळी, बहिरेवाडीचे मुख्याध्यापक एम. एस. कांबळे, धामणे शाळेचे महादेव हत्तरगी उपस्थित होते. आभार सुभाष आजगेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले.




