Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'जागृती' त समुपदेशन कार्यशाळा उत्साहात संपन्न

महिला दक्षता समिती सदस्य श्रीमती रेखा पाटील यांनी केले मार्गदर्शन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्याच्या धावपळीच्या युगात मुलींच्या बाबतीत अघटित प्रकार घडत आहेत. वाईट नजरा तिच्यावर पडत असून मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.टवाळ खोऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मुलींना घाबरू नका तुमच्यासाठी निर्भया पथक सज्ज आहे.त्यासाठी संरक्षणासाठी कणखर बनणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महिला दक्षता समिती सदस्य रेखा पाटील यांनी जागृती हायस्कूलमध्ये झालेल्या समुपदेशन कार्यशाळेत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक  उमेश सावंत होते.

              



स्वागत व प्रास्ताविक इराप्पा मरडी यांनी केले. मार्शल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती नीता कांबळे यांनी विद्यार्थिनींना 'बॅड टच, गुड टच' यातील फरक सांगून आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी निर्भयतेची गरज असल्याचे सांगून स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिकेही करून दाखवली. पोलीस अंमलदार संतोष ढवळे यांनी कायद्याविषयीचे मार्गदर्शन केले. उमेश सावंत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.




यावेळी रिजवाना मुल्ला यांच्यासह सर्व शिक्षिका विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गीता पाटील यांनी केले व पर्यवेक्षक  शिवाजी अनावरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.