Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुगडीकट्टी येथील निर्व्यसनी मोलमजुराचा कर्जाने घेतला बळी



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बुगडीकट्टी येथे गजानन भीमराव नाईक (वय ४१) या अत्यल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. निर्व्यसनी व सरळ स्वभावी गजाननाचा कर्जाने बळी घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. 



याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत गजानन यांची परिस्थिती प्रतिकूल आहे. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होते. माळकरी असल्याने निर्व्यसनी व सरळ स्वभावी होते. अंगावरील कर्ज फेडण्यासाठी आटोकाट ते प्रयत्न करत होते मात्र कुटुंबावर एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटांना सामना करताना पुन्हा कर्जाचा डोंगर वाढत असल्याने ते नैराश्यात होते. यातूनच त्यांनी शुक्रवारी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बुगडीकट्टी ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.