पोलीस उपनिरीक्षक पदावरील ४५ पोलीस अंमलदार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक
पोलीस हवालदार पदावरील २४ जण सहायक उपनिरीक्षक
पोलीस नाईक पदावरील २७ जण पोलीस हवालदार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ९६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी जाहीर केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरील ४५ पोलीस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती, पोलीस हवालदार पदावरील २४ जणांना सहायक उपनिरीक्षकपदी, तर पोलीस नाईक पदावरील २७ जणांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे.
उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळालेल्यांमध्ये दिनकर पाटील, राजाराम पाटील, आप्पासाहेब सातवेकर, शशिकांत मेतके, सुहास शिंदे, बाबूराव घोरपडे, दादामिया कापसे, इम्तियाज कोठीवाले, बबन माळी, राजेंद्र पताडे, प्रल्हाद पाटील, सचिन पाटील, अस्लम पठाण, नरसू गावडे, सिकंदर शेख, शंकर निरटे, दीपक रेडेकर, फत्तेसिंह काटकर, मिलिंद झेंडे, रवींद्र खाडे, अनिल पाटील, पांडुरंग वरोटे, आण्णासोो पाटील, बसाप्पा मुत्तनवार, मीलन धम्मदीक्षित, मारुती ठिकारे, शेखर सवतेकर, सुनील कवळेकर, मानसिंग पाटील, अलीम भालदार आदींचा समावेश आहे.

