Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हरळी खुर्दचे शेतकरी पाच वर्षांनंतर करणार होडीने प्रवास!

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण 


ग्रामपंचायतीच्या वतीने पाठपुरावा ; शिवाजीराव पाटील यांनी घातले लक्ष


कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केली मदत





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हरळी खुर्द येथील शेतकरी तब्बल पाच वर्षानंतर नदीपलीकडील शेती करण्यासाठी होडीने प्रवास करणार आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे येथील शेतकरी बांधवांना नवीन होडी प्राप्त झाली आहे. नदीपलीकडील  शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागणारा प्रवास यामुळे थांबला आहे. ग्रामपंचायतीने केलेला पाठपुरावा व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी या प्रश्नात  घातलेले लक्ष यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नवीन होडी देण्यात आली आहे. या होडीचे लोकार्पण आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावच्या सरपंच साधना आयवाळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत  नदीपात्रात सोडण्यात आली.




हरळी खुर्द येथील शेतकऱ्यांना नदी पलीकडे शेती करण्यासाठी यापूर्वी एक होडी होती. मात्र २०१९ ला आलेल्या महापूरात ती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. शेती करण्यासाठी नदी पलीकडे जाण्यासाठी हारुर, गजरगाव‌ या मार्गे फेरा मारून जावे लागत होते. याबाबत ग्रामपंचायतीने सतत पाठपुरावा करत लक्ष वेधले होते. दरम्यान, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष घालत जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन होडी उपलब्ध करून दिली. शेतकरी बांधवांना नवीन होडी प्राप्त झाल्याने  नदी पलीकडे ये-जा करणे सोपे होणार आहे.

     



दरम्यान, या होडी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी घरकुल आवास योजनेंतर्गत लाभार्थी धोंडूबाई गुरव यांच्या घरकुलाचा पायाभरणी शुभारंभ देखील आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.



यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संदीप आदमापुरे, उपसरपंच चंद्रकांत राजे, ग्रा.पं सदस्य शशिकांत चौगुले, श्रीदेवी कानडे, भारती पाटील, वर्षा गुरव, प्रदीप आयवाळे , संजय नाईक, सुषमा कुंभार,अनिता साळवी, रामभाऊ चोथे , बाबूराव पाटील ,भैरु मांगले, सचिन गुरव, आबांजी पाटील यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.