गावातील विविध समस्यांसंदर्भात करण्यात आली चर्चा
समस्या व प्रश्ने तातडीने मार्गी लावण्याचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांचे आश्वासन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड (ता. गडहिंग्लज) येथे भारतीय प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महिला सभा व गावसभेच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महिला सभा घेण्यात आली. यामध्ये महिलांसाठीच्या योजना, सोयी सुविधा तसेच त्यांच्या समस्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर गावसभा पार पडली. यामध्ये गावातील नागरिकांच्या समस्या, अडचणी यांची चर्चा करून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली.
सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी गावामध्ये झालेली विकास कामे, सुरु असलेली विकास कामे याची माहिती दिली. तसेच यापुढेही अशीच विकासकामे पूर्ण करून गावचा सर्वांगीण विकास केला जाईल असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव यांनी ग्रामपंचायतीकडून राबविलेले अभिनव उपक्रम, शासनाकडून आलेल्या योजनांची अंमलबजावणी, यशस्वी पाठपुरावा, ग्रामपंचायतकडून राबविलेले जाणाऱ्या योजना यांची माहिती दिली.
यावेळी उपसरपंच सौ. रेखा सरदेसाई सदस्या सौ.हिराबाई चौगुले, सौ सुवर्णा गोसावी, श्रीमती सुरेखा गुरव, विजय गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, देवस्थान समिती अध्यक्ष सुनिल शेलार, माजी उपसरपंच भिमराव गोडसे, सुभेदार मेजर सदाशिव घेवडे, अशोक गुरव, राकेश चव्हाण, बाबूराव गोईलकर, संभाजी चौगुले, जोतिबा मांगले, धोंडीबा गोइलकर, रवींद्र बिरजे, स्वप्नील पाटील, जयवंत बिरंजे, मुख्याध्यापक श्री. कुंभार, श्री.पापळ, श्री.राजाराम लोहार, शिवाजी मांगले, सतीश चव्हाण, चंद्रकांत घस्ते, भालचंद्र गोडसे, आनंदा गोडसे, मारुती पाटील, सुकुमार गुरव, राहुल कांबळे, महादेव गुरव, सौ.पाथरवट, अंगणवाडी सेविका शांता कोरवी, सौ.मंगल मांगले, मदतनीस सुतार, आशासेविका सौ.माधुरी सुतार, बचत गटाच्या सीआरपी सौ. शितल मांगले, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.






