Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रसिध्दीपासून अलीप्त व्यक्तींचा गौरव करणे ही बाब खरोखरच कौतुकास्पद !

गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचे प्रतिपादन 


गडहिंग्लजला मित्रांगण परिवाराच्या वतीने 'माँ तुझे सलाम' कार्यक्रम व मान्यवरांचा गौरव 



                                                 छायाचित्र : मज्जिद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : स्वतःपेक्षा दुसऱ्यानी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याचे दानत असणे गरजेचे आहे. एका मंडळाने दुसऱ्या मंडळाचे कौतुक करणे तसेच समाजात प्रसिध्दीपासून अलीप्त असलेल्या व्यक्तींचा गौरव करणे हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे व मित्रांगण परिवाराचा हा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घेण्यासारखा आहे असे प्रतिपादन गडहिंग्लजचे तहसिलदार ऋषिकेत शेळके यांनी केले. 



गडहिंग्लज येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मित्रांगण परिवारा मार्फत 'माँ तुझे सलाम' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गजानन शिक्षण समूहाचे डॉ. संजय चव्हाण होते.




प्रारंभी तहसिलदार ऋषीकेत शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरिक्षक अजयकुमार सिंदकर, गडहिंग्लजचे इस्टेट डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे नवाब मालदार, उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्ण समिती सदस्य महेश सलवादे, सामाजिक कार्यकर्ते उदय परीट, मित्रांगण परिवाराचे अध्यक्ष युवराज बरगे यांच्या हस्ते रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.




मित्रांगण परिवाराच्या सदस्यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 'जयोस्तुते जयोस्तुते' या गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. तर कार्यक्रमाची सांगता 'सबसे आगे होंगे हिंदूस्थानी' या समुहगीताने झाली.




याच कार्यक्रमामध्ये प्रसिध्दीपासुन दूर पण शहरात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या नदीवेसचा राजा व लकी खिदमत ग्रुप यांचा सत्कार करण्यात आला. या दोन मंडळाबरोबरच शहरातील ज्येष्ठ नागरिक बळवंत नारायण खोत, इंदूमती देवेकर, घुडूसो शेख, आप्पासो बस्ताडे, माजी सैनिक कुमार पाटील, महेश सलवादे, विजय पन्हाळकर, विशाल रोटे, महादेव बारामती, मधुकर बडदारे यांचा शाल, रोप व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या कु. सुकन्या सुधीर शिवणे, कु. मीनल मकानदार व भारतीय सैन्यात लेप्टनंट पदी निवड झालेल्या पृथ्वीराज पाटील यांचाही गौरव करण्यात आला.



कार्यक्रमात हिदायत नाईकवडी यांनी गायीलेल्या 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा' व गीता पाटील, गीता तेरणीकर व राजू भुईंबर यांनी गायिलेल्या 'दिल दिया हैं जॉन भी देंगे' या गीतांना रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. या बरोबरच राजेश माने, सारीका कांबळे, रामगोंडा पाटील, मनिष कोले, अभिनंदन बारामती, यांच्या बरोबरच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गडहिंग्लज पोलीस दलातील भारती करडे, दिलीप पाटील व मित्रांगण परिवारातील सदस्यांनी सहभाग दर्शविला.



कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक अर्जुन हराडे यांनी तर सुत्रसंचालन सौ. अश्विनी पाटील यांनी केले. स्वागत युवराज बरगे यांनी केले. आभार मजीद किल्लेदार यांनी मानले.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रांगणचे अध्यक्ष युवराज बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्देश्वर खाडली, रफिक पटेल, राहूल सकट, रामगोंड उर्फ गुंडया पाटील, प्रशांत मोहिते व मोहसीन अत्तार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.