Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एमएसईबीचे सेवानिवृत्त फोरमन एम.आय. तांबोळी यांचे ८५ व्या वर्षात पदार्पण

गडहिंग्लजच्या लकी खिदमत फौंडेशनकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : एमएसईबीचे ( सध्याचे महावितरण कंपनी) माजी फोरमन एम आय तांबोळी यांनी नुकतेच ८५ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त त्यांना लकी खिदमत फौंडेशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.


श्री. तांबोळी यांचा जन्म १० जानेवारी १९४१ मध्ये राधानगरी तालुक्यातील फेजिवडे या गावी झाला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात ( सध्याचे महावितरण कंपनी ) राधानगरी येथील पॉवर हाऊस मध्ये रुजू झाले. येथे दीर्घ सेवा बजावल्यानंतर १९६२ साली गडहिंग्लज येथे त्यांची बदली झाली. त्यावेळी डिझेल पॉवर हाऊस हे भडगाव रोड या ठिकाणी होते. त्या काळी फक्त रात्रीचीच लाईटची सोय असायची. त्यानंतर १९६३ साली गडहिंग्लजमध्ये रॉकेलचे दिवे ( अर्थात कंदील) चौकाचौकात असायचे. कालांतराने पुढे ते बंद करून या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू झाला. १९६४ मध्ये ३३ केव्ही क्षमतेची विद्युत लाईन राधानगरीहून गडहिंग्लज येथे आणण्यात आली. त्यानंतर शहरात विजेवरील दिवे प्रकाशमान झाले. याचे साक्षीदार खुद्द श्री. तांबोळी होते. १९६५ साली त्यांचा विवाह झाला. वीज खात्यात फोरमन या पदावर प्रदीर्घ सेवेनंतर १९९९ साली ते सेवानिवृत्त झाले. आता त्यांनी ८५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली असता त्या काळातल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष अमजद मीरा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.