Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज विद्या संकुलात उद्या ‘राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार’ सोहळा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलाच्यावतीने दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता विद्या संकुलाच्या प्रांगणात ‘राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात गोरगरीब, वंचित, कष्टकरी, शोषित घटकासाठी काम करणारे अतुलनीय व्यक्तिमत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना ‘कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार’ निपाणीचे माजी आमदार प्रा.सुभाष जोशी यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे हे भूषविणार आहेत. 




शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष के.जी.पाटील, जे.वाय.बारदेस्कर, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यात शिवराज विद्या संकुलातील ‘कर्मवीर गुणवंत शिक्षक व कर्मचारी’ पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे व संचालक प्रा.विश्वजित कुराडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.