Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथे उद्या श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती सोहळा

१ फेब्रुवारी रोजी कळसारोहण सोहळ्याचे आयोजन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील श्री हनुमान मंदिर वास्तुशांती सोहळा दिनांक ३१ जानेवारी रोजी तर कळसारोहण सोहळा शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.



शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी नूल येथील सुरगीश्वर मठाचे मताधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व श्रीमंत लिंगोंडा विरगोंडा देसाई इनामदार यांच्या हस्ते वास्तुशांती कार्यक्रम पार पडणार आहे.



शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कळसारोहण सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता गावातून कळस मिरवणूक निघणार आहे. या सोहळ्याला डॉ. चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री शैलपीठ, श्रीशैलम, सुरगीश्वर  मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, महांत सिद्धेश्वर स्वामीजी जडेयसिद्धेश्वर आश्रम बेलबाग, गडहिंग्लज यांची उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व ग्रामस्थ, देणगीदार  व भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.