भाजपा अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे गडहिंग्लज पालिकेला निवेदन
प्रशासकीय ठराव करून शासन दरबारी पाठवण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहर हद्दवाढ प्रारूप विकास आराखड्यामधील वडरगे रोड येथील रि.स. नं. 144 मधील आरक्षण क्र. 1, बेघरांसाठी गृहप्रकल्प HFD1 चे क्षेत्र 2.50 एकरा ऐवजी 15 एकर एवढे वाढविण्याचा प्रशासकीय ठराव करून महाराष्ट्र राज्य शासनास पाठविण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी अभियंता सेलचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लाभार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याने सदर गृहनिर्माण प्रकल्पाकरीता 2.5 एकर एवढे आरक्षण अपूरे पडत आहे. सदर प्रकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोल्डन ड्रीम प्रोजेक्ट (PMAY) अर्बन D+ व्दारे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून 10 हजार घरांचा प्रकल्प विचाराधीन आहे. गडहिंग्लज शहराचा हद्दवाढ विकास आराखडा शासनाच्या मंत्रीमंडळ स्तरावर अंतिम मंजूरीसाठी प्रस्तावित आहे. सदर शासकीय मालकीच्या जागेतील आरक्षण क्षेत्र 15 एकर पर्यंत वाढविण्याचा प्रशासकीय ठराव करून तातडीने महाराष्ट्र राज्य शासनास पाठवावा. अशी मागणी या निवेदनातून अभियंता चंद्रकांत सावंत यांनी केली आहे.

