Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथील आशीर्वाद अकॅडमीच्या प्रतीक कुंभारचे कंपनी सेक्रेटरी परीक्षेत यश



गडहिंग्लज  (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथील प्रतीक बाळासो कुंभार याने अतिशय कठीण परिस्थितीतून इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या आणि  देशातील तिसऱ्या क्रमांकावर अवघड समजली जाणारी परीक्षा पास होऊन तो कंपनी सेक्रेटरी झाला. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 



प्रतीक कुंभार याने गडहिंग्लज येथील आशीर्वाद अकॅडमी मधून कंपनी सेक्रेटरी फाउंडेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्याने पदव्युत्तर शिक्षण एमबीए फायनान्समधून पूर्ण केले. आशीर्वाद अकॅडमीचा पहिला कंपनी सेक्रेटरी म्हणून सुद्धा त्याने मान मिळवला. प्रतीकला 

 


आशीर्वाद अकॅडमीचे संचालक अमित कुलकर्णी,  महावीर मरजे, सौ. मेघा गिजवणेकर, सौ. संपदा पवार केसरकर आणि प्रतीकचे  वडील  बाळासो कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रतीकचे या यशाबद्दल गडहिंग्लजसह सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.