Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कर्नाटक - महाराष्ट्रातील बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी हालचाली

बेळगाव - कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न  




बेळगाव : गेल्या काही दिवसापासून कर्नाटक आणि महाराष्ट्र या   उभय राज्यांमधील बससेवा बंद आहे. दोन्ही राज्यामधील बससेवा पूर्ववत सुरु करण्याबाबत बेळगाव आणि  कोल्हापूरच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. दोन्ही राज्यांतील बससेवा पूर्ववत  करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुरक्षा याविषयी बेळगाव आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत  बेळगाव आणि कोल्हापूरचे  वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. कर्नाटकच्या बस फक्त महाराष्ट्र सीमेपर्यंत तर महाराष्ट्राच्या बस कर्नाटक सीमेपर्यंत धावत आहेत. यामुळे प्रवाशांची पंचाईत झाली आहे.


बैठकीला बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते.


बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी कर्नाटकची बससेवा महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सुरू राहील तेथून पुढे  महाराष्ट्राच्या एस टी तून प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोचवले जाईल अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी    मोहम्मद रोशन यांनी दिली.


कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आवश्यकती उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे.  दोन्ही राज्यांतील बसवर किंवा कर्मचाऱ्यावर  हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एस टी च्या चालकावर हल्ला करणाऱ्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा सुरळीत होण्यासाठी लवकरच  मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत.  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचे  राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक होऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.