दड्डी : मुलांना वाचनाची सवय लागावी, चांगल्या पुस्तकांच्या वाचनामुळे ज्ञानात पडावी, चांगले संस्कार व्हावेत त्यासाठी कथा, कादंबरी,चरित्र, वर्तमानपत्र इत्यादींचे वाचन करणे फार महत्त्वाचे आहे. या हेतूने दड्डी येथील श्रीमती सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूल येथील शिक्षक विठ्ठल पाटील यांनी शिवचरित्र प्रत्येक मुलांनी वाचावे म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या शिवचरित्राचे वाटप केले.
यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. गेली तेरा वर्ष आपली कन्या कु. मानसी हिच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप करून शिक्षक विठ्ठल पाटील वाढदिवस साजरा करतात.

