Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गडहिंग्लज युनायटेड'ची विजयाची हॅट्ट्रिक

केएसए ग्रामीण फुटबॉल लीग


संयुक्त भिमनगरची केबीआरवर सहज मात


                                              छायाचित्र : अशपाक किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन (केएसए) मार्फत सुरु असलेल्या ग्रामीण फुटबॉल लीगमध्ये आज तिसऱ्या दिवशी सकाळी गडहिंग्लज युनायटेडने सलद तिसरा विजय नोंदवत हैटट्रिक साजरी केली. संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लबने काळभैरी फुटबॉल क्लबचा ४ -१ अशी सहज मात करून आगेकूच केली. येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेचे गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने संयोजन केले आहे.




पहिल्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अ संघाने आपल्याच ब संघाचा ४ – ० गोलनी पराभव करून स्पर्धेत विजयाची हैटट्रिक केली. पुवार्धात युनायटेडच्या सिध्दार्थ दड्डीकरने पहिला गोल करून खाते उघडले. सतराव्या मिनिटाला अवधूत चव्हाणने गोल करून आघाडी २-० अशी केली. मध्यतरानंतर सिध्दार्थने आपला वैयक्तीक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करून वर्चस्व राखले. पन्नासाव्या मिनिटाला बदली खेळाडू सौरभ मोहितेने गोल करून ४-० असा विजय साकारला.




दुसऱ्या सामन्यात संयुक्त भिमनगरने केबीआरचा ४-१ असा पराजय करून आगेकूच केली. पूर्वार्धात दहाव्या मिनिटाला गोलरक्षक आणि बचावपटूतील गोंधळात स्वयं गोलमुळे केबीआर अनपेक्षितपणे पिछाडीवर पडला. बावीसाव्या मिनिटाला सौरभ हुलसारने मैदानी गोल करून भिमनगरची आघाडी २-० अशी केली. मध्यतरानंतर ६० व्या मिनिटाला प्रशांत सलवादेने गोल करून ३-० अशी स्थिती भक्कम केली. सामन्याच्या ६४ व्या मिनिटाल केबीआरचा सुयोग मानेने गोल करून पिछाडी ३-१ अशी कमी केली. पण, ६५ व्या मिनिटाला बाळाप्पा हुलसारने गोल करून भिमनगरचा ४-१ असा विजय निश्चित केला. उर्वरित  ४ सामने पुढील आठवडयात होणार आहेत.




लागोपाठ पराभव


आजच्या सामन्यात नवोदित गडहिंग्लज युनायटेड ब संघाचा दुसरा पराभव झाला. काल (ता. ९) सामन्यात पुवार्धात भिमनगरला झुंजवणाऱ्या ब संघाच्या युवा खेळाडूंना कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. केबीआर संघाला देखील सॉकर ट्रेनिंग पाठोपाठ भिमनगरकडून दुसरा पराभव स्विकारावा लागला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.