Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी उर्दू विद्यामंदिर शाळेत पाककृती स्पर्धा उत्साहात

विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना व राष्ट्रीय पोषण सप्ताह अंतर्गत उर्दू विद्यामंदिर तेरणी शाळेत पाककृती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.



यामध्ये तृणधान्यापासून पौष्टिक आहार बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पालकांचा सहभाग देखील ठेवण्यात आला होता. यामध्ये प्रथम क्रमांकला मिक्सर शिफा मेडिकल यांच्या कडून, द्वितीय क्रमांक डिनर सेट मे.रॉयल एजन्सी, तृतीय क्रमांक पाच लिटर कुकर मे.अयान कन्स्ट्रक्शन, चतुर्थ क्रमांक टिफिन बॉक्स मे.वारना ग्लासेस व पाचवा क्रमांक इडली कुकर मे.तौफिक नियाज ऑटोमोबाइल्स यांच्याकडून तर सर्व सहभागी स्पर्धकांना भेट वस्तू व प्रमाणपत्र  दस्तगीर करीमगोळ यांच्याकडून  देण्यात आले होते. स्पर्धेत सौ.परवीन हसन मुल्ला, सौ. शाहजादबनु इरफान छाडेदर, सौ.नाजमीन इम्तियाज देसाई, सौ. इफ्तेहसाम दस्तगीर करीमगोळ व सौ.आफरीन अल्ताफ नेसरी अनुक्रमे एक ते पाच पारितोषिके पटकावली.



या स्पर्धेचे परीक्षण रिजवान माणगावकर व सौ. जयश्री कांबळे यांनी परिक्षण केले. सहभागी सर्व स्पर्धकांना भेट वस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.