Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कर्नाटकातही चंदगडचा डंका ; सुंडी गावची कन्या झाली 'मिस बेळगाव'



चंदगड : चंदगड तालुक्यातील सुंडी गावच्या अनुष्का राजीव पाटील  (वय १५, सध्या राहणार हिंडगाव बेळगाव) हिने नुकत्याच झालेल्या IFW इंटरनॅशनल फॅशन विक बेळगाव (कर्नाटका) २०२५ मिस बेळगाव १८ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळवत यशाचे शिखर गाठले.परिश्रम आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर तिने जिल्हास्तरीय पारितोषिक मिळवले.



अनुष्का स्वतःचे Anushka Patil नावाने YouTube चॅनल असून जवळपास २० हजार फॉलोवर्स आहेत. मागील काही दिवसांपूर्वी बेळगाव येथे रॅम वॉक व मिस बेळगाव, अठरा वर्षाखालील स्पर्धा राबवण्यात येणार असल्याची एक जाहिरात आई प्रिया पाटील यांनी मोबाईलवर पाहिली. या स्पर्धेत आपली अनुष्का सहभागी व्हावी, अशी आईने इच्छा घरात बोलून दाखवली. सर्वांनाच ती कल्पना आवडली.




अनुष्का लहानपणापासूनच बुद्धिजीवी, हुशार अधिक काळ आजोबांच्या सोबत वेळ घालणारी, आजोबा झिम्मांना पाटील (सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक) यांच्याकडून शैक्षणिक बाळकडू अनुष्काला मिळाले. मराठी माध्यमाच्या शाळेतून आपल्या मुलांनी शिकावे, उच्चपदस्थ अधिकारी किंवा शिक्षक व्हावे, असे नेहमी आजोबांना वाटायचे. तसे त्यांनी घरात शिक्षण दिले. त्यामुळे वाचन, लेखन, भाषण या सर्वच बाबतीत अनुष्का नेहमी तरबेज झाली. प्रथमतः सुंडीमध्ये शिक्षण आणि नंतर विद्यानिकेतन बेळगाव शाळेत प्रवेश घेतला. वडील राजीव पाटील हेही नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या श्री रामलिंग हायस्कूल व जुनियर कॉलेज तुडये येथे विज्ञानाचे तज्ञ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत . यामुळे अनुष्काला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत  तर झालीच व शैक्षणिक प्रगतीत  वाढ झाली. आई प्रिया पाटील उच्चशिक्षित व फैशन डिझायनरमुळे उत्तम मार्गदर्शक झाली. अनुष्काचे काका दुबई येथे इंजिनीयर तर काकी येथे एम.डी डॉक्टर आहे. त्यांचेही नेहमीच मार्गदर्शन अनुष्काला मिळते.



अनुष्काचे व्यक्तिमत्व मराठी विद्यानिकेतन बेळगावचे प्राचार्य एम. सी. उंडकेकर, जी. व्ही. सावंत, व मराठीचे सहाय्यक शिक्षक प्रसाद सावंत यांनी ओळखले. चौथीतच अनुष्काला २०१९-२० सालचा शाळेचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मिळाला. नंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी, यांच्या वतीने स्वरचित काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. गुरुवर्य वि. गो. साठे बेळगाव आयोजित कवी संमेलन २०२४ बालकवी पुरस्कार मिळवत अनुष्काने गरुड झेप घेतली. अनुष्काचा नवीन काव्यसंग्रह सुद्धा प्रसिद्ध होत आहे. बेळगाव येथील शाळेचे न्यूज बुलेटीन चॅनेल असून त्याचे प्रमुख सूत्रसंचालन व अँकर म्हणून अनुष्का आपली जबाबदारी चोख पार पाडते. याव्यतिरिक्त अनुष्काने अनेक भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. विज्ञान प्रदर्शनामध्येही पारितोषिक मिळवले असून, बुद्धिबळ स्पर्धेतही खूप आवडली. स्पर्धेत भाग घेऊन आपण अनुभव तरी घेऊया असा सर्वांचा निश्चय झाला. ट्रेडिशनल की वेस्टर्न युनिफॉर्म असावा यासाठी विचारमंथन सुरू झाले. रॅम वाँक करताना आकर्षक कलाकृती कपड्यांवर असाची ही भावना आई प्रिया पाटील यांनी ओळखली होती. त्यानुसार आईने स्वतःच्या लग्नाची साडी त्याचाच उत्कृष्ट ड्रेस करण्याची योजना आखली. आपल्या धागा या इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग मध्ये या ड्रेसचे काम सुरू झाले, तिथे शिकत असलेल्या विद्यार्थिनीनीही मदत केली. त्यानुसार ड्रेसेस वर्क एम्ब्रॉयडिंग असे करत ड्रेस तयार झाला. रॅम्पवींक शोही जवळ आला. अनेक तरुणींनी याच्यात सहभाग घेतला. याच्यासाठी अनुष्काने क्लास लावला नाही. आपला अचूक दृष्टिकोन ठेवून आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन अगदी घडाडीने रॅम्प वॉक दिला आणि सर्वांची मने जिंकली आणि अगदी पंधरा वर्षाची, नववीत शिकत असलेली अनुष्का मिस बेळगाव (कर्नाटका) झाली. अनुष्का व तिच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेना. अख्या बेळगावमध्ये वेगळी ओळख अनुष्काला मिळाली. लहान वयातच घेतलेली गगनभरारी नक्कीच अनुष्काच्या मैत्रिणींसह सर्वांना प्रेरणा देणारी ठरली. 




या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेल्या मिस महाराष्ट्र दीपाली खमार, मिस कर्नाटका, मिसेस साऊथ एशिया युनिव्हर्स अश्वगंधा कुगजी, फाउंडर डायरेक्टर एनी व्हॅग्स, यांच्यासह तज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. हा सोहळा आयोजन केला होता ते डायरेक्टर प्रोडूसर गणपत पाटील प्रमुख अतिथी डॉ. देवगावडा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. सर्वांनी अनुष्काचे भरभरून कौतुक केले. अनुष्काला दोन मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली आणि अनुष्काने आईच्या तोंडातील नेहमी ऐकत आलेले एकच वाक्य सर्वांना ऐकवले. परिश्रम आणि कल्पनाशक्ती तर एकत्र आली तर साया कपडा देखील उत्तम कलाकृती बनू शकते. सर्वांनी कडकडून टाळ्या दिल्या. खरोखरच आईने स्वतःच्या लग्नातील साडीचा बनवलेला ड्रेस त्यात आईने ओतलेले भरभरून प्रेम, आईने घेतलेले श्रम, वडिलांनी दिलेले मार्गदर्शन याच्यामुळेच आपल्याला हे यश मिळवता आले.  अनुष्का आपला जन्मदिवस वृद्धाश्रमात साजरा करते. पुढील काळात अनुष्काला अभिनय क्षेत्रात रुची असून सामाजिक कार्य करत आजोबांच्यासारखे वेगळी ओळख निर्माण करायची आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.