Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा शहरातील भारत नगर वसाहतीमधील पायाभूत सुविधांसाठी ३ मार्च रोजी 'संघर्ष मोर्चा' काढणार

मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांची माहिती 

         



आजरा : आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर भागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा झाल्या पाहिजेत या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 3 मार्च  रोजी "संघर्ष मोर्चा" काढण्याचा इशारा तहसीलदार, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत वितरण कंपनी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन मुक्ती संघर्ष समितीचे राजाध्यक्ष संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.




या निवेदनात म्हटले आहे की, आजरा शहरातील भारतनगर वसाहत १९९७  पासून अस्तित्वात आहे. मात्र या वसाहतीला पायाभूत सुविधा मिळालेला नाहीत. नगरपंचायत झाल्यानंतर केवळ आश्वासने दिलेली आहेत. मात्र त्यावर ठोस भूमिका घेऊन अंमलबजावणीची कार्यवाही झालेली नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा कायदानुसार शहरामधील विविध पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. त्यामुळे भारत नगर मधील लोकांच्यासाठी पायाभूत सुविधांची ठोस अंमलबजावणी झाली पाहिजे.



भारतीय संविधानाच्या कलम 243W (Article 243W) मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार आणि कर्तव्यांबद्दल सांगितले आहे. या कलमांद्वारे नगरपंचायतींना स्थानिक पातळीवर विविध सेवांचा पुरवठा करणे आवश्यक आहे, ज्यात सांडपाणी व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे.


      

येथील नगरपंचायतीच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा अत्यंत आवश्यक ठरल्या आहेत. काही भागात महत्त्वाच्या सुविधांचा अभाव आहे, ज्यामुळे लोकांचे जीवन प्रतिकूल होत आहे. या संदर्भात भारत नगर मधील नागरिकांनी यापूर्वी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. मात्र यावर कार्यवाही झालेली नाही.



भारतनगर भागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब मिळाल्या पाहिजेत,  रस्ते, गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याची सुयोग्य व्यवस्था करावी, खुल्या जागेत लहान मुलांसाठी अंगणवाडी,  खेळण्यासाठी गार्डन तयार करण्यात यावे, स्ट्रीट लाईट तातडीने कार्यान्वित करावे, या ठिकाणी झालेल्या कामांची यादी व सुरू असलेल्या कामांची यादी आणि होणाऱ्या कामांची यादी व त्या संदर्भातील कागदपत्रे संघटनेला मिळावेत आदी मागण्या या निवेदनातून केल्या आहेत. अन्यथा  मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने तर सोमवार दिनांक 3 मार्च रोजी संघर्ष मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.




यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला व भारत नगर मधील अब्दुलवाहिद सोनेखान, सलीम शेख, तोफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, खुदबू तगारे, गुलाब शिकलगार, यासीन सय्यद, सलीम नाईकवडे, मुद्दसर इंचनाळकर, नईम नाईकवडे, शौकत पठाण,आसिफ मुराद, सलीम ढालाईत, रहुफ नसरदी, सल्लाउद्दीन नसरदी, मोईन शेख, मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर, पापा लतीफ, मोहम्मद नसरदी, फहीम नसरदी, रहीम लतीफ, रशीद लाडजी मुफीद काकतीकर व इतर भारत नगर मधील नागरिक, मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.