Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जरळी येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्री मंदिरात मूर्ती व फोटो प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): जरळी (ता. गडहिंग्लज) येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्री मंदिरात मूर्ती व फोटो प्राण प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. रविवार व सोमवार असे दोन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



रविवारी सकाळी आठ वाजता हिरण्यकेशी नदीपासून पंत मंदिरापर्यंत मिरवणुकीने मूर्ती, फोटो वाद्यांच्या गजरात नेण्यात आले. यावेळी महिलांनी एकाच रंगाच्या साड्या नेसून डोक्यावर मंगल कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. नदीपासून मंदिरापर्यंत दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.




गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बरगे यांच्या हस्ते प्रेम ध्वजारोहण व वीणा पूजन झाले. त्यानंतर पुंडलिक रक्ताडे  यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. सोमवारी श्रीपंत महाराज मूर्ती व फोटो प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. सकाळी पंत मूर्तीवर अभिषेक घालण्यात आला.



यावेळी परमपूज्य डॉ. संजय पंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते मूर्ती व फोटो प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर डॉ. संजय पंत बाळेकुंद्री यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीपाद स्वामी यांनी पंत मंदिर स्थापनेची माहिती सांगितली. त्यानंतर पुंडलिक रक्ताडे, सीमा कुलकर्णी, आनंदा जाधव यांचे प्रवचन झाले. आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दोन दिवस जरळी, मुगळी, शिंदेवाडी,  चन्नेकुपी, हरळी, शेंद्री, हनिमनाळ हिटणी, तेगिनहाळ, श्रृंगारवाडी, राजगोळी, मतिवडे, भडगाव, दुंडगे येथील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी ग्रामस्थ व गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी  अवधूत प्रासादिक भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.