Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जागृती हायस्कूलचा 'रंगोत्सव २०२५' उत्साहात संपन्न

चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी 




गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) :  येथे प्रथमच विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची व शिल्पकलेची आवड निर्माण होण्यासाठी प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धा व निमंत्रित चित्रकला, शिल्पकला, रंगावलीकार यांच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन जागृती हायस्कूल गडहिंग्लज यांच्या संकल्पनेतून पार पडली.



प्रात्यक्षिक समारंभाचे उदघाटन गडहिंग्लजच्या माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या हस्ते झाले.  सहाय्यक शिक्षण संचालक कोल्हापूर स्मिता गौड व  मेंदूविकार तज्ञ डॉ. किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश घाळी होते.



सदर कार्यक्रमात चित्रकार विजय टिपुकडे, चित्रकार प्रवीण वाघमारे, चित्रकार नागेश हंकारे, चित्रकार बबन माने (कोल्हापूर) या चित्रकारांनी निसर्गचित्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. तर चित्रकार अभिजीत कांबळे , चित्रकार कशिश अडसूळ (कोल्हापूर), चित्रकार रमण लोहार ( गडहिंग्लज) यांनी व्यक्तिचित्राचे तर शिल्पकार सुनील यरकदावर यांनी शिल्पकलेचे आणि रांगोळीकार अनिल सुतार यांनी रांगोळीचे प्रात्यक्षिक दाखवले.




या प्रसंगी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव बी.जी. भोसाकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक वकील विकास पाटील, संगाप्पाना दड्डी, शिवयोगी घाळी, किशोर हंजी, प्राचार्य विजयकुमार चौगुले, उपमुख्याध्यापक उमेश सावंत, पर्यवेक्षक शिवाजी अनावरे, कलाशिक्षक अमित हिरेमठ, प्रकाश गायकवाड, मनोहर भोये, प्रवीण पाटील सर्व शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.