
हलकर्णी : येथे घरकुल योजना मंजुरी पत्राचे वाटप करताना सरपंच योगिता संगाज, अविनाश दुध्यागोळ, अशोक शेळके, बापू वाजंत्री.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत हलकर्णी ग्रामपंचायत तर्फे २०२४-२५ सालातील ५९ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे रामलिंग हॉलमध्ये वाटप करण्यात आले.
सरपंच सौ. योगिता संगाज, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके, ग्रामपंचायत सदस्य अविनाश दुध्यागोळ, बापू वाजंत्री, जयश्री लब्यागोळ यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
यावेळी सरपंच सौ. योगिता संगाज, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके, अविनाश दुध्यागोळ, लिपिक बापू वाजंत्री, जयश्री लब्यागोळ, ग्रामपंचायत लाभार्थी, ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.


