प्रा. शिवाजीराव होडगे यांचे प्रतिपादन
महागावच्या महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी अंतर्मुख होऊन बोर्ड परीक्षेला सामोरे जावे.कारण परीक्षा या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे.भविष्यात आपण कोणत्या क्षेत्रात करियर करणार आहे. हे याच परीक्षेच्या गुणावर ठरणार आहे.शिक्षकांनी वर्षभर भरभरून ज्ञान दिले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा असा सल्ला समाजशास्त्र विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवाजीराव होडगे यांनी दिला आहे.
ते महागावच्या महात्मा फुले जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील होते.प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक मोहन कांबळे उपस्थित होते.
प्रा. होडगे पुढे म्हणले,भविष्यात जीवनात यशस्वी झाल्यानंतर आपल्या शाळेबद्दल,आई-वडीला बद्दल व समाजाबद्दल कृतज्ञ असले पाहिजे.तरच आपल्याला समाजात मानसन्मान मिळणार आहे.
प्रा.भीमराव मनगुत्ते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुदर्शन गरुड,सायली कोकितकर,वर्षा तिळवले,नम्रता गोरुले यांनी मनोगत व्यक्त केले. तर पर्यवेक्षक मोहन कांबळे,संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नम्रता रेडेकर व सिद्धी हाजिरे यांनी तर आभार वेदांती सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी प्रा.मुकुंद मांडरे, प्रा.संजय मर्णहोळकर, प्रा.मायाप्पा धनगर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.




