Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर ग्रंथोत्सवाला गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी मोठ्या संख्येने जाणार

गडहिंग्लज येथील ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या बैठकीत निर्णय





गडहिंग्लज (प्रतिनिधी): उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य,  कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने इंचलकरंजी येथे दिनांक ६ व ७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या ग्रंथोत्सवास गडहिंग्लज तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय गडहिंग्लज येथील ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पूज्य साने गुरुजी  वाचनालय येथे ही बैठक पार पडली. 



यावेळी गडहिंग्लज वाचनालयाचे ग्रंथपाल व कार्याध्यक्ष राजू भुईम्बर यांनी ग्रंथोत्सव बद्दल कर्मचाऱ्यांची उपस्थिती व वार्षिक अहवाल याबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, या बैठकीचे औचित्य साधून मुगळी येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयाला गंगामाई वाचन मंदिर आजरामार्फत पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला.



स्वागत माजी अध्यक्षा सुषमा पोवार यांनी केले. यावेळी अध्यक्ष के. डी. धनवडे, सचिव सचिन ओहरा, संस्थापक अध्यक्ष श्रीपाद स्वामी,  सुभाष खोत, सुषमा पोवार, अंनत गुरव, महादेव भकरी, सुरज फुटाणे,  सुधा सावंत, लता गुरव, माधुरी कुंभार,  सोनल पाटील, नेताजी पाटील, नारायण देसाई, राजु भुईम्बर,  संतोष भोसले यांच्यासह तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते.आभार के. डी. धनवडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.