शिंदे शिवसेना गडहिंग्लज तालुका प्रमुख संजय संकपाळ, शहर संघटक काशिनाथ गडकरी यांचे पालकमंत्र्याना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील घरकुल योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी शिंदे शिवसेना गडहिंग्लज तालुका प्रमुख संजय संकपाळ, शहर संघटक काशिनाथ गडकरी यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गडहिंग्लज शहर शांतताप्रिय शहर असल्याने बाहेरील व्यावसायिक, नोकरदार लोक मोठ्या प्रमाणात येथे स्थायीक झाले आहेत. तसेच बिल्डर रिकाम्या फ्लॉट बघून त्या ठिकाणी अपार्टमेंट बांधून मोठ्या किमतीने विकत आहेत. त्यामुळे गडहिंग्लज शहरात रिकाम्या जागा मिळणे अवघड झाले आहे.
गरीब बेघर लोक गेली वीस वर्षे राजकीय पक्ष, अनेक संघटनांच्या माध्यमातून शासनाकडून घरे मिळावेत म्हणून विविध आंदोलने करत आहेत. आता नगरपालिकेने गडहिंग्लज येथील वडरगे रोड या ठीकाणी अडीच ऐकर जागा आरक्षित केल्याचे समजते, पण बेघर भाडेकरूंची संख्या अधिक असल्याने अडीच कर ऐवजी पंधरा एकर जागेची मागणी केली आहे. या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा व्हावी यासाठी मुख्याधिकारी यांच्या उपस्थित कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी गडहिंग्लज तालुका शिवसेना प्रमुख संजय संकपाळ, शहर संघटक काशिनाथ गडकरी यांनी केली आहे.


