Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘शिवराज श्री २०२५’ चा रोहित दळवी मानकरी

बेस्ट डेव्हलपर सौरभ मोहिते तर बेस्ट पोझरचा शहानुरे नाईकवडे यांना बहुमान 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत रोहित दळवी  ‘शिवराज श्री २०२५’ मानकरी ठरला. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांच्या हस्ते ‘शिवराज’श्री’ रोहित दळवी रोख पाच हजार, भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत बेस्ट डेव्हलपर- सौरभ मोहिते, बेस्ट पोझर-शहानुरे नाईकवडे आदी विजेते ठरले.




या स्पर्धेचे उदघाटन सुधाकर जगताप, जयशिवा कलकुटकी, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, संचालक प्रा. विश्वजित कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, स्नेहसंमेलन प्रमुख के. टी. कुंभार, ग्रंथपाल संदीप कुराडे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांना इरफान मकानदार, सुजित चव्हाण, ॲड. अरुण शिंत्रे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अशोक खोत, अवधूत संकपाळ, प्रशांत शेंडे, अशिफ मकानदार, डॉ.महेश चौगुले, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर, तुकाराम कांबळे, मोहन शिंदे, व्यंकोबा टेंबरे, विजय गुरव, आनंदा नाईक, साहिल देसाई, सुमित चौगुले, उत्तम राऊत, विनायक सुतार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.




स्वागत व प्रास्ताविक प्रा.जयवंत पाटील यांनी केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये या उपविभागामध्ये शिवराज विद्या संकुलाने शरीरसौष्ठव स्पर्धेची परंपरा आजही जपली आहे. यातून अनेक शरीरसौष्ठवपटू घडविलेले आहेत. शिवाजी विद्यापीठासह राष्ट्रीय स्तरावर या विद्या संकुलाचे शरीरसौष्ठवपटू चमकले आहेत. ही परंपरा अशीच पुढे चालविण्यासाठी आणि या भागातील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूंना प्रेरणा मिळावी यासाठी शिवराज विद्या संकुलातर्फे सर्वतोपरी सहकार्य करून या शरीरसौष्ठवला उर्जितावस्था येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन केले. या स्पर्धेसाठी वडील कै.विठ्ठ्लराव कुराडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी खुल्या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे ज्येष्ठ पंच म्हणून प्रा.के.बी.केसरकर, श्री संजय धुरे, झाकीर नदाफ, सुनील कलाल यांनी काम पाहीले.



वजन गटनिहाय अनुक्रमे विजेते-


६० किलो- शाहनूर  नाईकवाडे, अकबर सनदी, विरुपाक्ष घुळान्नावर


६० ते ७५ किलो- सौरभ मोहिते, आदर्श पाटील, साहिल खवरे,


७५ किलोवरील- रोहित दळवी, सचिन शिंगे,ओंकार पाटील


खुला गट-ओंकार पाडळकर, केदार सातपुते, सचिन कांबळे



या सर्व विजेत्यांना रोख रक्कम, चषक, तर खुल्या गटातील पहिल्या दहा विजेत्यांना अनुक्रमे रुपये पाच हजार ते पाचशे रुपयांची प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविले. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी क्रीडा शिक्षक डॉ.राहुल मगदूम, प्रा.जयवंत पाटील, प्रा.अक्षय तेलवेकर, अशोक पोवार, आनंदा नाईक, किरण सूर्यवंशी, हसन मकानदार, अंकुश देसाई, अभिजीत पेडणेकर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.