Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मेहनत आणि कष्ट घेणारे खेळाडू जीवनात यशस्वी होतात!

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांचे प्रतिपादन 


गडहिंग्लजला 'शिवराज'च्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त खेळाडूंचा विशेष सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ




गडहिंग्लज (प्रतिनिधी): खेळातून घडण्याची मोठी संधी आहे. जसा धरती मातेचा सन्मान होतो त्याप्रमाणे या मातीचा सन्मान झला पाहिजे. या मातीत अनेक खेळाडू घडले आहेत. जे खेळाडू मेहनत आणि कष्ट घेतात तेच खेळाडू आपल्या प्रयत्नाला बळ देऊन जीवनात यशस्वी होतात. कष्ट आणि प्रयत्नाला आपल्या आई-वडील, गुरुजन आणि वस्तादांचा आशीर्वाद असणे महत्वाचा आहे. आज शिक्षणाबरोबरच संस्कार देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी केले.



गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आणि विद्यापीठस्तरावर क्रीडा स्पर्धेतील उतुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माजी शारीरिक शिक्षण संचालक प्रा.आनंदराव नाळे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे क्रीडा अधिविभाग संचालक डॉ.शरद बनसोडे आदींसह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते.




प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्था सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेचा आढावा घेतला. –प्रा.गौरव पाटील  यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह पुढे म्हणाले- राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीत कुस्तीचा सन्मान होतो आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दिलेल्या योगदानाचे स्मरण करणे आवश्यक आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीत आल्याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगीतले. पूर्वी खेळाडू आपल्या खेळात चमकण्यासाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असत आता मात्र बदलत्या या जगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे शिक्षणाबरोबर स्वतःखेळातून सिध्द होणे गरजेचे आहे. हे विसरून चालणार नाही. आपल्या कर्तृत्वाला सिद्ध करताना आपले आई-वडीलांना विसरू नका. आणि आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. आज वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलींना देखील खेळातून घडण्याची संधी आहे. आपले कुटुंब घडविण्यात मोलाची भूमिका बजावणारी आई- वडील हे देव आहेत. त्यांचा सन्मान होणे महत्वाचा आहे. सर्वांनी व्यायाम करून तंदुरुस्त राहावे  आणि   छान आणि सुंदर जीवन जगत असल्याचा आनंद व्दिगुणित करावा असे  हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी स्पष्ट केले.




यावेळी विशेष अतिथी माजी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आनंदराव नाळे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवराज महाविद्यालयातील खेळाडूंनी ऑलंपिक पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरिता खेळाडूंना प्रोत्साहन बक्षीस देण्यात येईल.  खेळातून जीवन घडविण्याची संधी आहे. संधीचे रुपांतर यशात होणे गरजेचे आहे. त्यासाठी खेळाडूंनी कष्ट व मेहनत घेऊन ऑलंपिक चषक मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करून शिवराज महाविद्यालय हे खेळातून नैपुण्य सिद्ध करणारे सलग १२ वर्षे शिवाजी विद्यापीठाचे जनरल चॅम्पियनशिप पटकाविणारे महाविद्यालय खेळाडू घडले आहेत असे कौतुक करून सर्व खेळाडूंचे आभिनंदन केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी शारीरिक शिक्षण संचालक प्रा.राजाभाऊ खोत, माजी प्राचार्य टी.बी.चव्हाण, प्रो-कब्बडी स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष श्री नारायणराव कुराडे माजी शारीरिक शिक्षक चिदानंद कानडे, महादेवी बाकळे-खोत, तलवारबाजी प्रशिक्षक प्रफुल्ल धुमाळया कार्यक्रमात क्रीडाशिक्षक  डॉ.राहुल मगदुम व प्रा.जयवंत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आणि विद्यापीठस्तरावर क्रीडा स्पर्धेतील उतुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार व अन्य क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंचा गौरव माजी शारीरिक शिक्षण संचालक प्रा.आनंदराव नाळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ‘विशाल विष्णू पन्हाळकर, वैष्णवी विजय भोईटे, ज्युनिअर विभागाचे मधुरा उदयकुमार गोरुले, वेदांत सुरेश शेवाळे यांना  ‘वैयक्तिक जनरल चॅम्पियनशिप’ तर ‘सांघिक जनरल चॅम्पियनशिप’ बी.एस्सी.तीन च्या खेळाडूंना देऊन गौरविण्यात आले.




या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, राष्ट्रीय खेळाडू संदीप कंगुरे, धावपटू परशुराम भोई, यांच्यासह अन्य मान्यवर संस्थेचे उपाध्यक्ष के.जी.पाटील, जे.वाय.बारदेस्कर, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, संस्थेचे के. बी.पेडणेकर, बसवराज आजरी, श्री. नंदनवाडे गुरुजी, ॲड. श्री गुजर, माजी प्राचार्य डॉ. ए. ए. पोवार यांच्यासह संस्थेचे अन्य मान्यवर, फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, स्नेहसंमेलन प्रमुख के.टी.कुंभार, माजी रजिष्ट्रार बी.एस.मोहिते यांच्यासह माजी विद्यार्थी खेळाडू, पालक, शिवराजचे सेवानिवृत्त प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी बांधव, आजी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा पाटील, यांनी केले. संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.