जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील उपसरपंचपदी शशिकांत चौगुले यांची बिनविरोध करण्यात आली. चंद्रकांत राजे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या निवडीसाठी सभा पार पडली. सरपंच साधना आयवाळे अध्यक्षस्थानी होत्या.
उपसरपंचपदासाठी श्री. चौगुले यांचे नाव संजय नाईक यांची सुचविले. भारती पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी सदस्य चंद्रकांत राजे, प्रदीप आयवाळे, वर्षा गुरव, अनिता साळवी, सुषमा कुंभार, श्रीदेवी कानडे उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संदीप आदमापुरे यांनी आभार मानले.
दरम्यान, आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने नूतन उपसरपंच शशिकांत चौगुले यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, सचिव रामकृष्ण शेंडे, निजगोंडा पाटील, बसाप्पा आरबोळे, भरत येल्लुरे, खजिनदार संजय जाधव, भीमगोंडा पाटील, शशिकांत जाधव, धनाजी जाधव, बाळू पोवार, वाघराळी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सागर रेडेकर, सचिव आप्पा सावंत आदी उपस्थित होते.

