Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जरळीत दिनांक १६ व १७ रोजी श्री पंत महाराज बाळेकुंद्री मंदिरात कार्यक्रम

मूर्ती व फोटो प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): जरळी (ता. गडहिंग्लज) येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्री मंदिरात दिनांक १६ व १७ फेब्रुवारी रोजी मूर्ती व फोटो प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला आहे.


श्री मेघशाम महाराज ( बांबवडेकर,) यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून १९८८ साली या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यानिमित्त रविवार व सोमवारी दोन दिवस विविध कार्यक्रम पार पडत आहेत.


रविवारी सकाळी आठ वाजता हिरण्यकेशी नदीपासून मंदिरापर्यंत श्री पंत महाराज मूर्ती व फोटो सवाद्य  मंदिराकडे आगमन,  दुपारी बारा वाजता प्रेम ध्वजारोहण व विना पूजन दत्तात्रेय बरगे यांच्या हस्ते, साडेबारा वाजता पुंडलिक रक्ताडे (गडहिंग्लज) यांचे प्रवचन, दुपारी एक वाजता महाप्रसाद. यानिमित्त जरळी, मुगळी, शिंदेवाडी,  चन्नेकुपी, हरळी, शेंद्री, हनिमनाळ हिटणी, तेगिनहाळ, श्रृंगारवाडी, राजगोळी, मतिवडे, भडगाव, दुंडगे येथील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.


सोमवारी पंत महाराज मूर्ती व फोटो प्राणप्रतिष्ठापना सोहळा, सकाळी आठ वाजता मंदिरामध्ये अभिषेक व डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या हस्ते मूर्ती व फोटो यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी एक वाजता महाप्रसाद आयोजित केला आहे.



या कार्यक्रमास डॉ. संजय पंतबाळेकुंद्री (अकोळ), दत्तात्रय बरगे (गडहिंग्लज), श्रीमती लताताई अवधूत दातार (जळगाव),बाळासाहेब मोरे, पुंडलिक रक्ताडे,  प्रकाश रोटे, संजय रोटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री अवधूत प्रासादिक भजनी मंडळ व जरळी ग्रामस्थ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.