कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रभर २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस हा दिवस खूप उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा आहे. भारतातील अनेक प्रमुख भाषांपैकी एक मराठी भाषा आहे. तसेच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
या स्पर्धेमध्ये कु. सोनल वडणगेकर प्रथम तर कु.आरती माने व हर्षदा पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. सविता म्हाळुंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरचा उपक्रम कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी प्रा. पियुषा नेजदार,प्रा.दिव्या शर्के, प्रा. निकिता शेटे, प्रा.रुचा अष्टेकर, प्रा.सुप्रिया अजेटराव व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


