कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यसंपदेवर भित्तीपत्रक
गडहिंग्लज( प्रतिनिधी ) : येथील साधना प्रशालेत कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी शिक्षिका शितल हरळीकर यांनी केले .त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे उदघाटन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सदर भित्तिपत्रिकेत मराठी भाषेची महती व कवी कुसुमाग्रज यांची साहित्यसंपदा या विषयावर श्रीमती भवारी यांनी तयार केली होती. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पसायदान, मराठी भाषा गौरव दिनावर आधारित नृत्य, गीतगायन आणि शिवगर्जना सादर केली. ज्येष्ठ शिक्षक पी. आर. बैरागी आणि बी. एन. वाघमारे यांनी काव्यवाचन केले. या कार्यक्रमादरम्यान ग्रंथ कोपरा तयार करण्यात आला होता. या ग्रंथ कोपऱ्यामध्ये मराठी भाषेतील विविध ग्रंथ मांडण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षक संजय घोडके यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अभिमानास्पद गोष्ट आहे हे पटवून दिले त्याचबरोबर छावा कादंबरीबाबत विस्तृत माहिती देऊन छावा चित्रपट पाहा असे आवाहन केले. पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर, प्राचार्य आय . पी. कुटिन्हो यांनी मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मराठी भाषेचे संवर्धन तुमच्याकडून व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली.
आभार शिक्षिका सुनीता नाईक यांनी मानले . सूत्रसंचालन ॲबिगेल नोरेंज व केतकी शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी जॉन्सन सोज, अमोल शेडबाळे, संभाजी कुंभार, दिलीप अडसुळे, रमण लोहार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास आर. सी. हिरेमठ, विनय नाईक, पी .के. हरेर तसेच शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


