Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पी. एम. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी विशेष मोहीम

19 वा हप्ता दि. 24 फेब्रुवारी रोजी वितरीत होणार 





कोल्हापूर :  केंद्र शासन पी.एम.किसान योजनेचा माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील 19 वा हप्ता दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरीत करण्यात येणार असून विविध त्रुटीपुर्तता अभावी सुमारे 33 हजार 383 लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यासाठी जिल्ह्यात दि. 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती, आधार सिडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे. 


जिल्ह्यात ई-केवायसी प्रमाणीकरणाचे 7 हजार 515 प्रलंबित लाभार्थी असून यासाठी लाभार्थ्यांनी पी.एम.किसान मोबाईल ॲपमधून चेहरा स्कॅन करावा किंवा अंगठा स्कॅन करुन बायोमेट्रिक पध्दतीने ई केवायसी करावे. यासाठी महा ई सेवा केंद्र,  गावच्या कृषी सहायकाशी संपर्क साधावा.



नव्याने नोंदणी करण्यासाठी 345 प्रलंबित लाभार्थी असून यासाठी अलीकडचा 7/12, फेरफार, पती-पत्नी आधार कार्ड, वारस नोंद असल्यास फेब्रुवारी  2019 पूर्वी जमीनधारणा असलेला फेरफार पोर्टलवर अपलोड करावा. यासाठी महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा.



बँक आधार सिंडींगसाठी 11 हजार 23 प्रलंबित लाभार्थी असून यासाठी बँक शाखेशी संपर्क करुन आपले अद्यावत असलेले आधार कार्ड बँक खाती संलग्न करुन घ्यावे किंवा नजीकच्या पोस्टात DBT enbled असलेले खाते उघडावे. यासाठी बँक शाखा/ पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. 



नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या ते पाचव्या हप्त्याच्या वेळी UID Disabled व Bank Failure Transaction मुळे लाभ अदा न होऊ शकलेले 11 हजार 861लाभार्थी असून यासाठी बँक शाखेशी संपर्क करुन आपले अद्यावत असलेले आधार कार्ड बँक खाती संलग्न करुन घ्यावे किंवा नजीकच्या पोस्टात DBT enbled असलेले खाते उघडावे. यासाठी बँक शाखा/ पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. 



भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे याचे 2 हजार 639 प्रलंबित लाभार्थी असून यासाठी भूमिअभिलेख नोंदी संबधित १-१८ कॉलम मधील माहिती अद्यावत करावी व तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.



पी. एम. किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, भूमि अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी सहाय्यक /कृषी पर्यवेक्षक /मंडळ कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. 


केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 19 वा हप्ता दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी  वितरीत होणार असून त्यापूर्वी प्रलंबित बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होणार आहे. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमे दरम्यान करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.