Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून "डे विथ कलेक्टर"उपक्रमात आदी प्रकाश झिरळे या विद्यार्थीने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे



कोल्हापूर :  काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कणेरी येथील शाळेमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी आदी प्रकाश झिरळे या विद्यार्थीने डे विथ कलेक्टर उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले. काल दिवसभरात झालेल्या बैठकीत आदी झिरळे हिने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतली.




आदी प्रकाश झिरळे हिने सांगितले की, मला "डे विथ कलेक्टर" या उपक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कामकाज जवळून पाहण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे हे प्रत्येक बैठकीतील विषयामध्ये बारकाईने लक्ष देतात. आज मला प्रशासकीय कामकाज कसे चालते त्याचबरोबर कशा प्रकारे एखादा विषय हाताळावा हे आज मला कळाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आज मला भरपूर शिकण्याची संधी मिळाली असेही ती म्हणाली.





शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी. तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि ‘जिल्हाधिकारी’ यांच्या करिअर व कार्याची माहिती घेवून यातून त्यांना प्रेरणा मिळावी. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  "डे विथ कलेक्टर" हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. उत्सुक, प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.